Showing posts with label नाणी. Show all posts
Showing posts with label नाणी. Show all posts

Monday, April 28, 2008

चांदीचा राणीचा रुपया


बऱ्याच दिवसांनी लिहीतो आहे, तेव्हा एका मस्त नाण्याबद्दल लिहीतो. हे नाणे ब्रिटीश काळातले आहे. हा आहे व्हिक्टोरिया राणीच्या काळातला चांदीचा बंदा रुपया.

नाण्याच्या पुढल्या बाजूला "ONE RUPEE" असे इंग्लिशमध्ये लिहिलेले आहे. त्याखाली "INDIA" असे देशाचे नाव व वर्ष आहे. आजुबाजुने गोलात वेलबुट्टी काढलेली आहे. कडेला रेघा आहेत. या रेघांना "milling" असे म्हणतात. याचा उद्देश कोणी नाणे कडेने घासुन थोडी चांदी काढुन घेउ नये असा असे.


नाण्याच्या मागील बाजूस व्हिक्टोरिया राणीचे बाजुने मुकुट वगैरे घातलेले चित्र आहे. तसेच बाजूने "VICTORIA" व "QUEEN" असे लिहिलेले आहे.

पुर्वापकाळापासुन चालत आलेले चांदीचे एक रुपयाचे नाणे हे बरोबर एक तोळा वजनाचे असे. किंबहुना रुपयाची व्याख्याच एक तोळा चांदी अशी होती. ह्या वजनाचा चांदीचा रुपया फार पुर्वीपासुन चालू आहे. ह्या वजनाचा रुपया प्रथम शेर शहा सुरीच्या काळात पाडला गेला असे म्हणतात. साधारण पहिल्या महायुद्धापर्यंत ह्या वजनाचा चांदीचा रुपया प्रचलीत होता. पुढे युद्धकाळात चांदीच्या टंचाईमुळे चांदी जाऊन रुपया निकेलचा बनला.

एक तोळा म्हणजे अंदाजे 11.5 ग्रॅम. आजच्या बाजारभावाने या रुपयातल्या चांदीचीच किंमत जवळपास रु. 260/- होईल!

Wednesday, August 29, 2007

मी इथे काय लिहिणार आहे?

सुरुवातीला तरी भारतीय नाण्यांविषयी काहीबाही माहिती लिहीत राहण्याचा विचार आहे. मग बघू काय काय सुचते ते. कदाचित मी काय काय वाचतो आहे ते लिहीन, काही खास विचार करण्यायोग्य दिसेल ते लिहीन, कधी थोडी छायाचित्रं, कधी नुसतेच विचार किंवा मते लिहीन.